30 ऑगस्ट 2020
यमुनेच्या काठी श्रीकृष्णाने कदंबाच्या वृक्षाखालीच सुरेल बासरी वाजवून वृंदावनवासियांना मंत्रमुग्ध करून सोडले.
श्रीकृष्ण आपल्या संवगड्यासमवेत बालक्रिडेत कदंबाच्या डेरेदार वृक्षाखालीच खालीच रमला.
श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी आपल्या गाई यमुनेच्या काठावरील कदंबवनात नेत असत.
सर्वांना उपद्रव देणा-या 'कालिया' नागाचे मर्दन श्रीकृष्णाने कदंबाच्या झाडावरूनच उडी मारून केले.
भारतीय पुराण, साहित्य, संस्कृतीमध्ये ज्या वृक्षाचा वारंवार उल्लेख आहे ,असा हा सुंदर 'कदंब वृक्ष' मला माझ्या घरालगतच्या सोसायटीच्या कंपांउडवॉलजवळ आजच सकाळी नजरेस पडला.
अलभ्य दृष्य!
कदंबाची असंख्य फूले फुलली होती त्यावर .
मंद सुवास आसमंतात दरवळत होता आणि वृक्षाखाली कदंबपुष्पाच्या केशरी केसराचा केशरी हलका पिवळा सडाच पडलेला होता.
माझे तर भानच हरखून गेले.!
श्रावणात/भाद्रपदात हा कदंब असंख्य केशरी,हलक्या पिवळ्या रंगांच्या फुलांनी बहरून जातो.
गोलाकार केशरी फिकट पिवळ्या रंगाचे अगणित पुंकेसर ,मंद सुगंधाचे अत्यंत देखणे फूल!
आय॔भट्टाने याच फुलांचा उल्लेख 5 व्या शतकात केला.
आय॔भट्टाने संशोधन केले'पृथ्वी गोल आहे आणि
सूर्याभोवती परिक्रमा करते.' त्याच्या विरोधकांनी आक्षेप घेतला, की पृथ्वी गोल आहे , फिरते तर प्राणी,वस्तू
पडत का नाहीत? आय॔भट्ट म्हणाला, 'की ज्याप्रमाणे कदंबपुष्पांचे केशर खाली पडत नाही ,त्याचप्रमाणे वस्तू,प्राणी गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडत नाही'
.
कुमारसंभवात पार्वतीच्या गालावरच्या लालिमेला कदंबफुलांची उपमा दिली आहे.
या भारतीय वृक्षाचा आयुर्वेदातही कदंबाच्या वापर होतो.
ज्योतिषशास्त्रात हजारो वनस्पती पैकी 27 वनस्पतींना आणि 27 नक्षत्रांना शुभ मानतात त्यापैकी कदंबाला शतभिषा नक्षत्रासाठी निवडले आहे.
महाकवी कालिदासांच्या मेघदूत या सुप्रसिद्ध काव्यात देखील कदंबाचा उल्लेख आहे.
माझ्या मोबाईल कॅमे-याने काढलेले घराजवळील कदंबाचे काही फोटो!
No comments:
Post a Comment